Dailyhunt
बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्याच पवारांची धडपड; पण फडणवीसांनी तामिळनाडूत जाऊन राहुरीचा विषयच मिटवला!!

बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्याच पवारांची धडपड; पण फडणवीसांनी तामिळनाडूत जाऊन राहुरीचा विषयच मिटवला!!

The Focus India 1 week ago

नाशिक : बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्याच पवारांची धडपड; पण देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूत जाऊन राहुरीचा विषय मिटवला!!, ही राजकीय घडामोड आज घडली.

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला.

तो अर्ज दाखल करताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री बारामतीत हजर होते. शरद पवार मात्र दिल्लीत राज्यसभेची शपथ घेण्याचे निमित्त साधून बारामतीत गैरहजर राहिले. पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. खुद्द सुनेत्रा पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ या दोन नेत्यांना फोन करून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करायची विनंती केली. पण काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करणे टाळले. पवारांच्या प्रयत्नांना काँग्रेसने खोडा घातला.

पटेल, तटकरेंचा अपमान

याच दरम्यान बारामतीतल्या काही निनावी अजित पवार समर्थकांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना "घातकी" म्हणून त्यांचा अपमान केला. एकट्या अजितदादांचे नाव पुरेसे, घातकी पटेल आणि तटकरे नकोत!!, असे पोस्टर झळकवले.

फडणवीसांचा तामिळनाडूतून राहुरीसाठी फोन

पण एकीकडे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्या पवारांची धडपड सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तामिळनाडूतल्या मदुराईत जाऊन राहुरीचा कार्यक्रम करून टाकला. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तो उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हजर होते. या दोन्ही नेत्यांनी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करू नये अशी विनंती केली. विखे पाटील आणि रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांचे बोलणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी करून दिले देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी अर्ज दाखल करू नये अशी सूचना केली. यावेळी देवेंद्र फडणवीस तामिळनाडूतल्या मदुराईत भाजपच्या प्रचारात मग्न होते.

देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवायचा इरादा सोडून दिला. राधाकृष्ण विखे पाटील रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या माणसांनी आपल्याला निवडणूक न लढविण्याची सूचना केली, त्यामुळे ती मान्य करावी लागल्याची प्रतिक्रिया प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.

एकीकडे बारामतीचे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्या पवारांनी धडपडाट केला, पण देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूतून राहुरीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम बिनविरोध करून ते मोकळे झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India