Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Delhi Earthquake: दिल्लीत पहाटे भूकंपाचे धक्के; गाढ झोपेत असताना नागरिकांना जाणवले हादरे

Delhi Earthquake: दिल्लीत पहाटे भूकंपाचे धक्के; गाढ झोपेत असताना नागरिकांना जाणवले हादरे

The Focus India 6 days ago

विशेष प्रतिनिधी

वी दिल्ली : राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना अचानक हादरे जाणवल्याने काही ठिकाणी नागरिक घराबाहेर पडले.

मात्र, या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. Delhi Earthquake

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (National Centre for Seismology - NCS) यांच्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 4.14 वाजता भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता 2.9 इतकी होती, तर केंद्रबिंदू दिल्लीच्या उत्तर जिल्ह्यात असून भूकंपाची खोली 8 किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली.

तज्ज्ञांच्या मते, 2.9 तीव्रतेचा भूकंप हा सौम्य स्वरूपाचा मानला जातो. अशा प्रकारच्या भूकंपामुळे सामान्यतः मोठ्या प्रमाणावर नुकसान होत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची नोंद करण्यात आलेली नाही.

दिल्ली भूकंपप्रवण झोन-4 मध्ये

दिल्ली आणि आसपासचा परिसर भूकंप संवेदनशील झोन-4 मध्ये मोडतो. त्यामुळे या भागात वेळोवेळी सौम्य ते मध्यम तीव्रतेचे भूकंप होत असतात. यापूर्वी 27 जून 2026 रोजीही दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी अफगाणिस्तानात झालेल्या 6.2 तीव्रतेच्या भूकंपाचे परिणाम उत्तर भारतातील काही भागांपर्यंत जाणवले होते.

अरुणाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के

दिल्लीसह अरुणाचल प्रदेशातही रविवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, तेथेही कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीची नोंद झालेली नाही.

महाराष्ट्र आणि जपानमध्येही अलीकडे भूकंप

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. हा भूकंप रात्री 2.37 वाजता झाला होता. त्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नव्हती.

दरम्यान, अलीकडेच जपानमध्येही शक्तिशाली भूकंप झाला होता. या भूकंपामुळे मोठी खळबळ उडाली होती आणि अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त समोर आले होते.

भूकंपाच्या खोलीचे प्रकार

भूकंप पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 700 किलोमीटर खोलीपर्यंत उद्भवू शकतो. खोलीनुसार भूकंपाचे तीन प्रकार मानले जातात:

उथळ (Shallow) - 0 ते 70 किमी
मध्यम (Intermediate) - 70 ते 300 किमी
खोल (Deep) - 300 ते 700 किमी

उथळ खोलीवर होणारे भूकंप तुलनेने अधिक जाणवतात आणि नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India