Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दिल्ली पोलिसांच्या नावाने AI-निर्मित बनावट व्हिडिओ प्रसारित; काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात गुन्हा

दिल्ली पोलिसांच्या नावाने AI-निर्मित बनावट व्हिडिओ प्रसारित; काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात गुन्हा

The Focus India 2 weeks ago

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : दिल्ली पोलिसांचे उपायुक्त (DCP) सुमित झा यांच्या नावाने AI-निर्मित बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0063/2026 नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे सोशल मीडिया सह-संयोजक निखिल भामरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

एफआयआरनुसार, @Bhaijagtap1 या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचा भास निर्माण करणारा AI-निर्मित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या पडताळणीत संबंधित व्हिडिओ बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, समाजात संभ्रम निर्माण करणे, जनतेची दिशाभूल करणे आणि खोटी माहिती पसरविण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India