होम
ज्या पध्दतीने तक्रार मागे घेतली ते धक्कादायक, रेणू शर्मांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने ज्या पध्दतीने तक्रार मागे घेतली ते धक्कादायक आहे. याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकी-बाळींना भोगावे लागतील. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने ज्या पध्दतीने तक्रार मागे घेतली ते धक्कादायक आहे. याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकी-बाळींना भोगावे लागतील. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. The manner in which the complaint was withdrawn is shocking, take action against Renu Sharma, demands Chitra Wagh
चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेतली. वाघ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रेणू शर्मा हिने बलात्कारासारखा गंभीर आरोप करुन नंतर तक्रार मागे घेतल्यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल.
अशा परिस्थितीत खोटे आरोप केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करायला हवी. खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचेच आहे. खोट्या आरोपांमुळे राजकीय कार्यकर्ता असू दे किंवा सामान्य माणूस असू दे, तो उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ कलम 192 नुसार कारवाई करावी.
काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. पण अचानक हा आरोप तिने मागे घेतला.
The manner in which the complaint was withdrawn is shocking, take action against Renu Sharma, demands Chitra Wagh