होम
कोरोना लस निर्मितीनंतर पुरवठ्यातही भारताची आघाडी, जगभरातील 92 देशांचे भारतीय लसीला प्राधान्य

कोरोना लसीच्या उत्पादनानंतर भारताने आता लसीचा पुरवठा करणारा देशांमध्ये आघाडी घेतली आहे. ऐतिहासिक लसीकरणाची मोहीम भारताच्या विविध राज्यांत वेगाने वाटचाल करत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून, भारतात लसीचे फार कमी दुष्परिणाम दिसून आले आहेत. याचबरोबर जगातील जवळपास 92 देशांनी भारताच्या कोव्हॅक्सिन आणि मेड इन इंडिया कोव्हिशील्ड लसीची मागणी नोंदवली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना लसीच्या उत्पादनानंतर भारताने आता लसीचा पुरवठा करणारा देशांमध्ये आघाडी घेतली आहे. ऐतिहासिक लसीकरणाची मोहीम भारताच्या विविध राज्यांत वेगाने वाटचाल करत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून, भारतात लसीचे फार कमी दुष्परिणाम दिसून आले आहेत. याचबरोबर जगातील जवळपास 92 देशांनी भारताच्या कोव्हॅक्सिन आणि मेड इन इंडिया कोव्हिशील्ड लसीची मागणी नोंदवली आहे. India leads in vaccine supply after corona vaccine production, demand for Indian vaccine from 92 countries around the world
ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशील्ड लसीची निर्मिती पुण्यातील सीरम संस्थेद्वारे केली जात आहे. तर कोव्हॅक्सिनचे उत्पादन इंडिया बायोटेकने केले आहे. नुकत्याच आलेल्या जगभरातील प्रमुख देशांच्या चाचणी अहवालात असे दिसून आले आहे की, चीनची कोरोना लस जास्त प्रभावी नाही. यामुळे जगभरातून भारतीय लसींना मागणी वाढली आहे.
काही देशांनी थेट भारत सरकारकडे लसींची मागणी केली आहे, तर काही देशांनी लस निर्मिती कंपन्यांकडे ऑर्डर नोंदवली आहे. ताज्या वृत्तानुसार, डॉमिनिकन रिपब्लिक देशाने भारतीय लसीची मागणी नोंदवली आहे. यापूर्वी, ब्राझीलने पंतप्रधान मोदींना या लसीसंदर्भात विनंती पत्र लिहिलेले आहे. बोलिव्हिया सरकारनेही 5 लाख डोसचा सीरमशी करार केला आहे. या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, जपान, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि थायलंड हे देशही भारतीय लसीसाठी उत्सुक आहेत.
India leads in vaccine supply after corona vaccine production, demand for Indian vaccine from 92 countries around the world
शेजारच्या देशांना प्राधान्य देणार असल्याचे भारताचे धोरण असल्याने भारत सरकारने प्रथम नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार या देशांना लसींचे डोस पाठवले आहेत. तर काही देशांना नजीकच्या काळात पुरवठा केला जाईल. लवकरच ही लस भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशल्स येथे पुरविली जाईल. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस येथील नियामक संस्थांनी मंजुरी देताच ही लस तेथे पोहोचवण्यात येणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानही भारताकडून लस घेण्यास उत्सुक आहे. लसींच्या जागतिक संघटनेकडे पाकिस्तानने तशी मागणी नोंदवली आहे. पाकिस्तानात भारतीय लसींना मंजुरी मिळालेली असली तरी अद्याप कागदोपत्री व्यवहार झालेले नाहीत.