होम
महिलांच्या विवाहबाह्य संबंधांना माझा पाठिंबा; ममतांचा जुना व्हिडिओ व्हायरल

विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील मुस्लिम मतपेढीवर डोळा ठेऊन नमाज पढण्यासाठी बुरखा घालून जाणाऱ्यया ममता बॅनर्जी यांनी खुले विचार दाखविण्यासाठी केलेले वक्तव्य गाजत आहे. गृहिणी आपल्या आवडीच्या पुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेऊ शकतात. माझे विचार इतके खुले आहेत की मी त्याला संमती देईल, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममता या अविवाहित आहेत. My support for women extramarital affairs mamata banerjee
सध्या ममता बॅनर्जी यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे लोकप्रियता टिकविण्यासाठी ममता आपली भूमिका कशी बदलतात याचे प्रत्यंतर या व्हिडीओने येत आहे. २०१८ मध्ये ममतांनी कोलकत्ता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये केबल ऑपरेटरर्सची एक बैठक घेतली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते.
जय श्रीराम घोषणेने ममता नाराज चक्क भाषण करण्यास नकार
याचे कारण म्हणजे ममता बॅनर्जी टीव्हीवरील मालिकांमध्ये दाखविल्या जाणाºया आशयाबाबत खूप नाराज होत्या. त्यांनी या मालिकांमध्ये दाखविल्या जाणाºया विवाहबाह्य संबधांवर त्यांनी टिका केली होती. या मालिकांमुळे तरुण पिढीवर वाईट संस्कार होतात, असे त्यांनी म्हटले होते. त्या म्हणाल्या होत्या की सध्या मी अनेक टीव्ही मालिका पाहते. बंगाली टीव्हीतील एक गट आपल्या तत्वांना वाईट पध्दतीने दाखवितो. आपल्या सिध्दांतांचे नकारात्मक पध्दतीने चित्रण करतो.
मात्र, यामुळे आपली प्रतिमा प्रतिगामी होईल अशी भीती वाटल्याने ममतांना आपले खुले विचार जाहीर करावेसे वाटले. व्हिडीओमध्ये त्या म्हणत आहेत की, मी सर्व गृहिणींना सागंू इच्छिते की जर तुम्हाला विवाहबाह्य संबंधांमध्ये राहायचे असेल तर तो तुमचा अधिकार आहे. मी त्यासाठी तुम्हाला पाठिंबाच देईल.
My support for women extramarital affairs mamata banerjee