Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणात CBIची मोठी कारवाई; डॉक्टर आणि शिक्षक अटकेत, आरोपींची संख्या 13 वर

NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणात CBIची मोठी कारवाई; डॉक्टर आणि शिक्षक अटकेत, आरोपींची संख्या 13 वर

The Focus India 1 week ago

वृत्तसंस्था

वी दिल्ली : NEET Paper Leak Case NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील एका डॉक्टरसह पुण्यातील कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे.

या नव्या अटकेनंतर प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 13 वर पोहोचली असून तपासाचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे.NEET Paper Leak Case

CBIने लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. तपास यंत्रणेनुसार, त्यांनी काही विद्यार्थ्यांना लीक झालेला केमिस्ट्रीचा पेपर मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या विद्यार्थ्यांमध्ये एका कोचिंग सेंटर चालकाच्या मुलाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. हा पेपर मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडून मिळाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.NEET Paper Leak Case

याचबरोबर पुण्यातील एका वैद्यकीय अकादमीतील फिजिक्स शिक्षक तेजस शाह यांनाही CBIने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर NEET-UG परीक्षेतील फिजिक्सचे प्रश्नपत्र मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे. या आधी अटक करण्यात आलेल्या मनिषा हवालदार यांच्याकडून हे प्रश्न त्यांना मिळाल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात CBIने आतापर्यंत दिल्ली, पुणे, नाशिक, जयपूर, गुरुग्राम, अहमदनगर आणि लातूरसह अनेक शहरांमध्ये छापे टाकले आहेत. तपासादरम्यान लॅपटॉप, मोबाईल फोन, कागदपत्रे आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. काही आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

NEET-UG 2026 परीक्षा पेपरफुटीनंतर देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आणि परीक्षा व्यवस्थेवरही टीका होत आहे. दरम्यान, सरकारने भविष्यातील परीक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा पर्यायही विचाराधीन असल्याचे संकेत दिले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India