Thursday, 21 Jan, 11.22 am The Focus India

होम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळला शेजारधर्म, शेजारी देशांना कोरोना लसीची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्भावाचे आणखी एक उदाहरण घालून देत शेजार धर्माचे पालन केले आहे. भारताने नुकतीच भूतान आणि मालदीव या आपल्या शेजारील देशांना भेट म्हणून कोरोना लसींचा पुरवठा केला आहे. विविध देशांना कोरोना लसींचा पुरवठा बुधवारपासून सुरू झाला असून, तो यापुढील काळातही सुरू राहील, असे मोदी यांनी सांगितले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्भावाचे आणखी एक उदाहरण घालून देत शेजार धर्माचे पालन केले आहे. भारताने नुकतीच भूतान आणि मालदीव या शेजारी देशांना भेट म्हणून कोरोना लसींचा पुरवठा केला आहे. विविध देशांना कोरोना लसींचा पुरवठा बुधवारपासून सुरू झाला असून, तो यापुढील काळातही सुरू राहील, असे मोदी यांनी सांगितले. Prime Minister Narendra Modi observed Corona vaccine in neighboring countries

भारताची लोकसंख्या जास्त असूनही भारताने कोरोना संकटावर इतर देशांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवले आहे. गेल्या 9 महिन्यांपासून देशावर घोंघावत असणारे संकट दूर करण्यासाठी देशभरात आता लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. भारताने काही कोरोना लसी शेजारील देशांना पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूतानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे 1.5 लाख डोस पाठवण्यात आले आहेत. यासोबतच मालदीवची राजधानी माले येथेही मुंबईमधून कोविशिल्डचे 1 लाख डोस पाठवले जाणार आहेत.


भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगामधील एक महत्त्वाचा देश म्हणून ओळखला जातो. भारताने आजपर्यंत अनेक आजारांवर लसींची निर्मिती केली आहे. तसेच इतर देशांना औषधांचा पुरवठाही केला आहे. आता जगावरील सर्वात भयानक संकट कोरोनावरही भारताने लस निर्माण केली आहे. भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम आहे. दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आधीच नोंदणी केली आहे. दरम्यान, भूतान आणि मालदीव या शेजारील देशांना भारताने भेट स्वरुपात लस पाठवली आहे.

चीन गरीब देशांना लस देण्याचा प्रस्ताव मांडत आहे. ज्यांच्याकडे लस खरेदीसाठी पैसे नाहीत, त्यांना कर्ज देत आहे. त्यात लॅटिन अमेरिकी व कॅरेबियन देश आहेत. या देशांत कोरोनामुळे स्थिती बिघडली आहे. या देशांना चीन कर्जाच्या स्वरूपात सुमारे ७०० कोटी रुपये फक्त चीननिर्मित लसी खरेदीसाठी देईल. या संकटकाळात आपण इतरांची काळजी घेत आहोत, हे चीनला दाखवून द्यायचे आहे. चीनमधील लस कंबोडिया, लाओस, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनामपर्यंत पोहोचावी, असा चीनचा प्रयत्न आहे. दुसरीकडे आफ्रिका, पूर्व युरोपसह काही देशांसोबत नेपाळही चीनच्या टार्गेटवर आहे.

भारत इतर देशांना पहिली खेप सद्भावना म्हणून पाठवेल. ज्या देशांना लस दिली जाईल त्यांना जास्त रक्कम द्यावी लागणार नाही. म्हणजे भारत सरकारला मिळणाऱ्या दरानेच पुरवठा होईल. नेपाळने अलीकडेच सरकारकडे लस पुरवठा करण्याची मागणी केली होती. आम्ही सीरमशी करार केला आहे, अशी घोषणा म्यानमार आणि बांगलादेशने केली होती. दक्षिण आशियातील देशांना पुरवठा केल्यानंतर भारत लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि पूर्वीच्या सोव्हिएत रशिया प्रजासत्ताकातील देशांना लस उपलब्ध करून देईल.

केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, कोरोना साथीतून जगाला मुक्त करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांत भारतही सहभागी आहे. कोरोना लसींचा पुरवठा करावा, अशी विनंती अनेक देशांनी भारताला केली आहे.

Prime Minister Narendra Modi observed Corona vaccine in neighboring countries

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India
Top