Friday, 11 Jun, 2.20 pm The Focus India

होम
Pune Unlock : पुण्यातील मॉल्स सोमवारपासून उघडणार ; दुकाने रात्री ७ वाजेपर्यंत खुली : अजित पवार

वृत्तसंस्था

पुणे : पुण्यातील मॉल्स सोमवारपासून ( ता. १४ जून) उघडण्यास परवानगी दिली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. Malls in Pune to open from Monday; Shops open till 7 pm: Ajit Pawar

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती. या बैठकीनंतर निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता देण्यात आली आहे.

याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आला प्रशासन लगेच निर्बंध बदलेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

पुणे महापालिका क्षेत्रातील मॉल खुले होणार आहेत. सर्व दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तर अभ्यासिका आणि वाचनालयं देखील 50 टक्के क्षमतेने खुली राहणार आहेत.

- सिद्धार्थ शिरोळे, भाजप आमदार, शिवाजीनगर

Malls in Pune to open from Monday; Shops open till 7 pm: Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India
Top