Dailyhunt
Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात 'निनावी' पत्राने खळबळ; रूपाली चाकणकरांवर गर्भलिंग निदानाला पाठबळ दिल्याचा गंभीर आरोप

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात 'निनावी' पत्राने खळबळ; रूपाली चाकणकरांवर गर्भलिंग निदानाला पाठबळ दिल्याचा गंभीर आरोप

The Focus India 1 week ago

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rupali Chakankar राज्यभरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका निनावी पत्राने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांना बीडमधून पाठवण्यात आलेल्या या पत्रात थेट राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या पत्रामुळे चाकणकर यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे.Rupali Chakankar

मिळालेल्या माहितीनुसार, या निनावी पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, रूपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीडमधील राष्ट्रवादीच्या एक महिला पदाधिकारी अशोक खरातकडे महिलांना घेऊन जात होत्या. विशेष म्हणजे, या पत्राचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या हेमा पिंपळे यांनी चाकणकर यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. "गर्भलिंग निदानाच्या कृत्याला रूपाली चाकणकर यांचे पाठबळ होते, ही गंभीर बाब असल्याचा" खळबळजनक आरोप पिंपळे यांनी केला आहे.Rupali Chakankar

एसआयटी चौकशीची मागणी

हेमा पिंपळे यांनी या पत्राची सत्यता तपासण्याची मागणी केली आहे. "बीडमधील अनेक महिला अशोक खरातकडे जात असल्याची चर्चा आधीपासूनच होती, मात्र या पत्रामुळे त्या चर्चांना आता अधिकृत आधार मिळताना दिसत आहे. पोलीस अधीक्षकांनी या पत्राची दखल घेऊन 'सुओमोटो' अंतर्गत हे प्रकरण एसआयटीकडे सोपवावे. तसेच पत्रावरील स्वाक्षरीची तांत्रिक तपासणी करून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा," असे आवाहन पिंपळे यांनी केले आहे.

चाकणकरांच्या अडचणीत वाढ?

अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीमार्फत सुरू असून दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यापूर्वीच एसआयटीने रूपाली चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, त्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायउतार झाल्या आहेत. अशातच आता गर्भलिंग निदानासारख्या संवेदनशील विषयात त्यांचे नाव गोवले गेल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India