Sunday, 24 Jan, 8.20 am The Focus India

होम
सेटींग-फिटींगच्या राजकारणातूनच तक्रारकर्तीला तक्रार मागे घ्यावी लागली, सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप

सेटींग-फिटींगच्या राजकारणात तक्रारकर्तीला तिची तक्रार मागे घ्यावी लागली. असा आरोप करत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : सेटींग-फिटींगच्या राजकारणात तक्रारकर्तीला तिची तक्रार मागे घ्यावी लागली. असा आरोप करत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. Complainant had to withdraw his complaint due to setting-fitting politics, alleges Sudhir Mungantiwar

मुनगंटीवार म्हणाले की, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुध्द बलात्काराची गंभीर तक्रार केवळ दबावातून मागे घेतली गेली. सत्तेत असलेल्यांवर अशा प्रकारचा आरोप झाला तर त्यांचा राजीनामा एवढ्यासाठीच मागितला जातो, की ती व्यक्ती सत्तेचा गैरफायदा घेऊन फिर्यादीवर दबाव आणू नये. याप्रकरणी अखेर तेच झाले.सत्तेच्या दबावानेच हे घडले सांगताना मुनगंटीवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एका महिलेने अत्याचाराचे गंभीर आरोप करीत मुंबई पोलिसात तक्रारही दाखल केली होती. विषयाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे, अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी केली होती. त्यामागे तक्रारकर्तीवर दबाव येऊ नये, हा उद्देश होता. मात्र, राजीनामा घेतला गेला नाही आणि झाले अखेर तेच, तक्रारकर्तीने तक्रार मागे घेतली. हे सत्तेच्या दबावानेच घडले. एखादी खोटी तक्रार दिली गेली, तर तक्रारकर्त्यावर गुन्हा दाखल होतो. गंभीर आरोप असल्यास त्यास अटकही होते. याप्रकरणी मात्र अटक झाली का, नाही झाली. याचाच अर्थ कुठेतरी दबावतंत्र राबवले गेले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

Complainant had to withdraw his complaint due to setting-fitting politics, alleges Sudhir Mungantiwar

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India
Top