Monday, 25 Jan, 7.20 am The Focus India

होम
शिवसेनेच्या माजी आमदारांचा शरद पवारांवर हल्लाबोल, पुरंदर विमानतळ बारामतीला नेण्याचा डाव असल्याचा आरोप

महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. पुरंदरचा प्रस्तावित विमानतळ बारामतीला नेण्याचा डाव शरद पवारांनी आखल्याचा आरोप शिवतारे यांनी केला आहे. purandar airport Former Shiv Sena MLAs attack Sharad Pawar


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

पुरंदरचा प्रस्तावित विमानतळ बारामतीला नेण्याचा डाव शरद पवारांनी आखल्याचा आरोप शिवतारे यांनी केला आहे. पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केलाय.

मात्र, कुठल्याही परिस्थितीत पुरंदरचं विमानतळ बारामतीला घेऊन जाऊ देणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे. पुरंदर विमानतळ बारामतीला हलवण्याचा कुठलाही निर्णय झाल्यास जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं करु असा इशारा त्यांनी दिला आहे. पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणं हे मोठं षडयंत्र आहे.विमानतळाची आधीची पारगाव आणि सात गावांची जागा बदलून नव्यानं रिसे, पिसे, पांडेश्वर आदी गावातील म्हणजे पुरंदर तालुक्यातील जागा घ्यायची आणि विमानतळाचं प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करुन तिकडचा विकास साधायचा. मग, विमानतळाच्या मागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी होणार आणि सर्वांगिण विकासाची संधी जाणार. त्यामुळे हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडण्यास सिद्ध आहोत, असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे.

पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला पुन्हा स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, नावडी, पिंपरी या परिसरात विमानतळ होत असल्याच्या चर्चा आहेत. कोणत्याही परिस्थितीत विमानतळासाठी जमिनी देणार नाही, अशी ठाम भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. पुण्यापासून जवळच पुरंदर येथे नवं विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव आता महाराष्ट्र सरकारनं मांडला आहे.

प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावं यासाठी 9 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण सचिव व नागरी उड्डाण सचिव उपस्थित होते. या बैठकीचे काही फोटो स्वत: शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले होते.

purandar airport Former Shiv Sena MLAs attack Sharad Pawar

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India
Top