Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shrikant Shinde : पक्षप्रवेशापूर्वी 'तळ्यातमळ्यात' भूमिकेमुळे अडचण; मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

Shrikant Shinde : पक्षप्रवेशापूर्वी 'तळ्यातमळ्यात' भूमिकेमुळे अडचण; मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!

The Focus India 2 weeks ago

वृत्तसंस्था

मुबई : Shrikant Shinde राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णय जितका महत्त्वाचा असतो, तितकाच मोठा फटका संभ्रमावस्थेमुळे बसू शकतो. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटात दाखल झालेल्या ६ खासदारांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला.

मात्र, या सत्तानाट्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची बंडखोरीच्या वेळची 'तळ्यातमळ्यात' भूमिका आता त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असताना, निष्ठावंतांना प्राधान्य देत ओमराजेंना 'वेटिंग'वर ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जागी डॉ. श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ खासदार श्रीरंग बारणे यांची नावे आघाडीवर आहेत.Shrikant Shinde

सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, तिथूनही त्यांनी प्रशासनाला हायअलर्टचे आदेश देत आपले प्रशासकीय कामकाज सुरू ठेवले आहे. एकीकडे हे सुरू असताना, दुसरीकडे दिल्लीतील मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यामुळे तांत्रिक अडचण दूर झाली असली, तरी परभणीचे खासदार संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांची मंत्रिपदाची संधी हुकण्याची चर्चा रंगली आहे.Shrikant Shinde

'ऑपरेशन टायगर'मध्ये अडथळा आणल्याचा फटका?

६ खासदारांच्या बंडखोरीदरम्यान आखलेल्या 'ऑपरेशन टायगर'मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी ऐनवेळी कार्यकर्त्यांशी चर्चेचे कारण पुढे करत संदिग्ध भूमिका घेतली होती. दोनतृतीयांश बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांचा गटप्रवेश अत्यंत महत्त्वाचा होता. त्या वेळी त्यांची मनधरणी करून त्यांना सोबत घेण्यात आले. मात्र, आता मंत्रिपद वाटपाच्या वेळी निष्ठावंतांना पुढे करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात कठोर शिस्तीचा मोठा संदेश दिल्याचे मानले जात आहे. पक्षांतर्गत निष्ठा आणि बंडखोरीच्या वेळी घेतलेली ठाम भूमिका यावरच नेत्यांचे भविष्यातील राजकीय वजन ठरेल, असा हा प्रशासकीय आणि राजकीय डावपेच आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India