होम
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना राज्य सरकारची भेट, यूपीमध्ये वसंत पंचमीपासून मोफत कोचिंगची सुविधा

योगी सरकारने उत्तर प्रदेशात सरकारी नोकरीची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी शनिवारी जाहीर केले की, बसंत पंचमीपासून सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. State government visits those preparing for competitive exams, free coaching facility in UP from Vasant Panchami
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : योगी सरकारने उत्तर प्रदेशात सरकारी नोकरीची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी शनिवारी जाहीर केले की, बसंत पंचमीपासून सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य स्थापना दिनानिमित्त बेरोजगार व गरजू तरुणांसाठी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या आणि यूपीमधील कामगारांना अन्य राज्यांत आणि परदेशात नोकरीसाठी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
लखनौच्या गौमतीनगर येथील अवध शिल्प या गावात आयोजित भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांचे सरकार बसंत पंचमीपासून 'अभ्युदय' ही नवीन योजना सुरू करणार आहे. या योजनेंतर्गत नीट, आयटीआय, जेई, यूपीएससीच्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणार्या गरजू तरुणांना आता त्यांच्याच जिल्हा व विभागात मोफत कोचिंगची सुविधा मिळणार आहे. डिजिटल कंटेट अॅक्सेस करण्यासाठी, उमेदवारांना टॅब्लेट, शैक्षणिक साहित्य आणि स्टायपेंडच्या रूपात पाच महिन्यांसाठी दरमहा 2000 रुपये प्रदान केले जातील.
State government visits those preparing for competitive exams, free coaching facility in UP from Vasant Panchami
अशाच अनेक लोककल्याणकारी योजनांमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेत वाढ होताना असल्याचे दिसून येत आहे. देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथांना नुकत्याच झालेल्या इंडिया टुडे सर्व्हेत स्थान देण्यात आले होते.