बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज तिच्या सकारात्मक विचारसरणीतून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच जॅकलिनने आपल्या स्टाफमधील एका सदस्यासाठी दसरा संस्मरणीय बनवला तेव्हा हे पुन्हा पाहायला मिळाले. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जॅकलिनने तिच्या स्टाफमधील एका सदस्यास भेट म्हणून गाडी दिली आहे.

जॅकलिनच्या स्टाफमधील हा सदस्य तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून तिच्यासोबत आहे.
यापूर्वी जॅकलिनने तिच्या मेकअप आर्टिस्टला देखील कार गिफ्ट केली होती आणि ती तिच्या स्टाफमधील तसेच तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या या स्वभावामुळे ओळखली जाते.
The post बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनची उदारता, स्टाफ मेंबरला कार गिफ्ट appeared first on थोडक्यात घडामोडी.

