Thursday, 29 Oct, 3.28 pm थोडक्यात घडामोडी

देश
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय केशुभाई पटेल यांचं गुरुवारी हृदयविकारानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते.

केशुभाई पटेल यांनी दोन वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भुषवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते. केशुभाई यांचा जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमध्येही समावेश होतो. दोन वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र राजकारणामुळे तख्तपालट होऊन दोन्ही वेळेला आपला कार्यकाळ त्यांना पूर्ण करता आला नाही.

१९७७ साली केशुभाई पटल राजकोटमधून लोकसभेचे खासदार बनले होते. त्यानंतर मात्र त्यांनी राजीनामा दिला आणि बाबूभाई पटेल यांच्या जनता मोर्चा सरकारमध्ये १९७८ ते १९८० पर्यंत कृषीमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.

२००१ साली त्यांच्याऐवजी नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी केशुभाई यांना आपला राजकीय गुरू मानत होते. व्हिडीओ ट्विट करत पंतप्रधान मोदी म्हणाले कि, आदरणीय केशुभाई पटेल यांचे निधन झाल्याने मी दु: खी आहे.

The post गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख appeared first on थोडक्यात घडामोडी.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat Ghadamodi
Top