Thursday, 21 Jan, 12.15 pm थोडक्यात घडामोडी

बातम्या
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी कोरोना लस घेणार

केंद्र सरकारने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री लस टोचून घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी लस टोकून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र लसीकरणाचा दुसरा टप्पा कधी सुरु होणार, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पन्नासीच्या पुढच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यामुळे पन्नाशीच्या पुढील सर्व खासदार आणि आमदारांना कोरोनाची लस टोचण्यात येणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान मोदी आणि इतर नेते लस टोचून घेणार आहेत.

The post केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी कोरोना लस घेणार appeared first on थोडक्यात घडामोडी.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat Ghadamodi
Top