Thursday, 04 Mar, 9.36 am थोडक्यात

होम
6,6,6,6,6,6.! युवराजचा रेकाॅर्ड 'या' खेळाडूने मोडला, पाहा व्हिडिओ

ऑन्टिजीया | भारताचा धुरंदर आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं 2007 मध्ये इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात एकाच षटकात 6 षटकार मारून इतिहास रचला होता. इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ड ब्राॅडच्या एका षटकात 6 षटकार ठोकत त्यानं हा कारनामा केला होता. आता वेस्ट इंडिजच्या पोलार्डने युवराजचा हा रेकाॅर्ड मोडीत काढला आहे. त्याने श्रीलंकाविरूद्धच्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यात हा इतिहास रचला आहे.

ऑन्टिजीया येथे झालेल्या श्रीलंकाविरूद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आणि वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरन पोलार्डने ही कामगिरी केली आहे. या सामन्यात श्रीलंकेचा मुख्य फिरकी गोलंदाज अकिला धनंजय 6 वं षटक टाकत होता. त्यावेळी वेस्ट इंडिज संघाच्या 5 ओव्हरमध्ये 62 धावा आणि 4 विकेट पडल्या होत्या. यामध्ये अकिला धनंजयने 2 षटकात वेस्ट इंडिजचे 3 महत्वाचे खेळाडू तंबूत परतवले होते. त्यानंतर याच धनंजयला कायरन पोलार्डने 6 षटकार लगावले.

इवन लुईस, क्रिस गेल आणि निकोलस पूरन या तीन महत्वाच्या खेळाडूचे बळी अकिला धनंजयने पटकावले. मजेशीर गोष्ट अशी की, याच सामन्यात अकिला धनंजयने दुसऱ्या षटकात हाॅट्रिक घेतली होती. वेस्ट इंडिजला या सामन्यात मोठ्या धावसंख्येची गरज नव्हती परंतू अकिला धनंजयनं यासामन्यात हाॅट्रिक घेत वेस्ट इंडिजवर दबाव निर्माण केला होता.

याआधी आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी कामगिरी फक्त दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज हर्षल गिब्स आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं केली होती. यानंतर पोलार्डनं कारनामा करणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. आता या यादीत वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डचं नाव नोंदवल गेलं आहे. आयसीसीने ट्वीट करत याची अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

'संजय राठोड अजुनही मंत्रीपदावरच'; चित्रा वाघ यांचा सरकारवर गंभीर आरोप

'वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही'

पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; मोबाईल आणि लॅपटाॅप भाजप नेत्यानं चोरला?

मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनाच्या भाषणातील राज्यातील 3 महत्वाचे मुद्दे व प्रश्न सांगा आणि बक्षीस मिळवा!

ठाकरे सरकारमधील मंत्रीच बेशिस्त, ते इतरांना काय शिस्त लावणार- पंकजा मुंडे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top