Sunday, 09 Aug, 10.52 pm थोडक्यात

महाराष्ट्र
8 दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानपूर्वक स्थापन करणार; कर्नाटक सरकारचा निर्णय

बेळगाव | बेळगावमध्ये मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. कर्नाटक सरकारने रातोरात शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. या घटनेने संतप्त शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात आंदोलनं केली. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे मनगुत्ती गावात तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर सकाळी अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि हुक्केरी तहसीलदार तसंच गावातील पंचाची बैठक झाली. या बैठकीमध्ये येत्या आठ दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्णय झालाय. आठ दिवसात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल.

5 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. गावातील एका गटाचा त्याला विरोध होता. मात्र ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. पण शुक्रवारी रातोरात हा पुतळा हटवण्यात आल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर गावातील महिला, तरुण मोठ्या संख्येने गावातील चौकात जमले होते. यासंदर्भात पोलीस, प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये बैठक झाली. शिवरायांचा पुतळा त्वरित बसवावा अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. पुतळा बसवेपर्यंत मागे हटणार नाही अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. एकमेकांच्या सहमतीने आठ दिवसात तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतात बनणार Apple चे MacBooks आणि iPads, एवढ्या हजार लोकांना मिळू शकतो रोजगार.

बोटावर मोजण्याइतके सिनेमे, तरीही इतक्या कोटींची मालकीण आहे रिया चक्रवर्ती

पुणे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा; 'या' मार्गांवर बससेवा सुरु, पण.

विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत लवकर निर्णय होणं आवश्यक आहे- सुप्रिया सुळे

सुशांतच्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणं म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमान- संजय राऊत

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top