Saturday, 21 Sep, 9.40 pm थोडक्यात

महाराष्ट्र
आमच्याकडे जमीन बळकावून मिळेल. भाजप नगरसेवकांची पोस्ट

पुणे | आमच्याकडे जमीन बळकावून मिळेल, संपर्क हिंजवडी पोलीस स्टेशन… पैसे जमीन पाहून ठरवले जातील, अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. पुण्यातील भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ही पोस्ट लिहिली आहे.

बालवडकर सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहेत. मात्र त्यांच्यावर अशा प्रकाराची पोस्ट सोशल मीडियावर टाकण्याची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी हे जमीन बळकावण्यासाठी लँड माफियांना मदत करत आहेत, असा आरोप अमोल बालवडकर यांनी केला आहे. बालवडकर यांचे पाहुणे विक्रम साखरे यांच्या हिंजवडीतील जमिनीची बेकायदेशीर मोजणी करण्यात येत होती, असा आरोप अमोल बालवडकर यांनी केला आहे.

अशाप्रकारे आर्थिक लोभापायी लँड माफियांना मदत करणाऱ्या पोलीस निरिक्षकाला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top