Wednesday, 05 Aug, 10.07 am थोडक्यात

होम
अ‌ॅमेझॉनचा बंपर धमाका. या दोन दिवशी मोबाईलवर मिळणार मोठे डिस्काउंट!

नवी दिल्ली | सध्या टाळेबंदीत सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. दुकाने आणि घरपोच ऑनलाईन डिलिव्हरी देणाऱ्या संकेतस्थळांना याचा चांगलाच फटका बसला आहे. हा आर्थिक फटका काही प्रमाणात भरून काढण्यासाठी Amazon या ई-कॉमर्स संकेतस्थळाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध मोबाईलवर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. Amazon ने मोबाईल आणि काही टॉप ब्रँड यांच्यासोबत मिळून ४०% सूट देण्याची योजना बनवली आहे.

कंपनीच्या विक्रीसाठी एचडीएफसी बँकही सोबत आहे. कार्ड आणि ईमआयने व्यवहार केल्यावर १०% अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर २५,००० रुपयांची तसेच Apple चा आयफोन ११ आणि आयफोन ८ प्लस यावर १०,००० रुपयांची सूट आहे.

Amazon ने स्मार्टफोनच्या खरेदीसाठी प्राईम डे सेल आयोजित केला आहे. यात रेडमी ९ प्राईम, रेडमी ९ प्रो, रेडमी ९ आणि रेडमी ९ प्रो मॅक्स यांची विक्री ६ ऑगस्ट रोजी १०, १२, २ आणि ४ वाजता होणार आहे. विक्रीसाठी निश्चित केलेले हे सर्व फोन विना व्याज ईमआयसोबत उपलब्ध आहे.

वनप्लस मोबाईलवर ४,००० रुपयांची , शाओमी मोबाईलवर ७,००० रुपयांची, ओप्पोच्या मोबाईलवर १४,००० रुपयांची, विवो मोबाईलवर ६,००० रुपयांची सवलत दिलेली आहे. जुने फोन एक्सचेंज केले तर ४,००० रुपयांची अतिरिक्त सवलत देण्यात आलेली आहे. मोबाईल फोन व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक आणि वस्तूंवर ६०% सूट मिळणार आहे. लॅपटॉप, स्मार्टवॉच, स्पीकर्स, टीव्ही आणि अन्य उपकरणही स्वस्तात उपलब्ध आहे. वाचकांसाठी ई-किंडलवर ४,००० रुपयांची सूट देण्यात आली आहे.

UPSC Result | मराठवाड्याच्या जयंत मंकलेने अंधत्वावर मात करत मिळवला देशात 143 वा क्रमांक

सलग 25 वर्ष आमदारकी भुषवलेले शिवसेना नेते अनिल राठोड यांचं निधन

भीती, भूक, भ्रष्टाचार अन आतंकवाद मुक्त समाजासाठी प्रभु श्रीराम मदत करतील - नितीन गडकरी

'रामायण' मालिकेतील सीता माईला अत्यानंद, म्हणाली यंदा दिवाळी खूपच लवकर आली.!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top