Tuesday, 07 Jul, 10.04 pm थोडक्यात

महाराष्ट्र
आनंदाची बातमी. पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

पुणे | पुण्यात वाढत्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा शासन आणि प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. आज पुण्यात नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. पुण्यात आज दिवसभरात 640 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे आता पुण्याची एकूण कोरोनाबाधित रूग्णसंख्या 23 हजार 21 वर पोहचली आहे.

आज दिवसभरात 672 रुग्ण बरे झाले. यामुळे अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या आज वाढली नाही. पुण्यात आतापर्यंत एकूण 10,451 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्यात 350 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 99 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे.

औरंगाबादेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी!

सुशांतसिंगच्या 'दिल बेचारा' सिनेमाच्या ट्रेलरचा करिश्मा; केला 'हा' जबरदस्त विक्रम

सुशांतसिंग राजपूतच्या अभिनेत्रीने पोलीस चौकशीनंतर मुंबई कायमची सोडली का?, आता म्हणते.

.या कारणामुळे करण जोहर रडून रडून बेजार!

कोरोना उपचार सुविधांसाठी महाराष्ट्राने ठेवला देशासमोर आदर्श

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top