Monday, 14 Jun, 6.36 pm थोडक्यात

महाराष्ट्र
आनंदाची बातमी! सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली 'ही' नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी

पुणे | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस दिली जात आहे. सीरमनं तयार केलेली आणखी एक लस लवकरच भारतात दिली जाणार आहे. अमेरिकेलीत नोवोवॅक्स कंपनीच्या मदतीने सीरम इन्स्टिट्यूने तयार केलेल्या SII novavax या लसीच्या चाचणीचे परिणाम खूपच सकारात्मक आले आहे.

SII novavax म्हणजेच NVX-CoV2373 कोरोना लस. 29,960 लोकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रयोगाचे परिणाम जारी करण्यात आले आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या लसीचा एकूण प्रभाव 90.4 टक्के आहे. तर मध्यम आणि तीव्र आजारापासून संरक्षण देण्यात ही लस 100 टक्के प्रभावी आहे.

अमेरिकेतील नोवोवॅक्स कंपनीनं सांगितलं, यूएस आणि मेक्सिकोमध्ये या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सपासून ही लस सुरक्षा देते. ही लस सर्वात जास्त प्रभावी आहे. प्राथमिक अहवालानुसार ही लस सुरक्षित आहे आणि जवळपास 90% प्रभावी आहे.

दरम्यान, या लसींचा साठा आणि वाहतूक सोपी आहे. जगभरात ही लस खूप फायदेशीर ठरणार आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत यूएस, युरोप आणि जगभरातील इतर देशांकडून कंपनी आपल्या लसीसाठी परवानगी मागणार आहे. त्यानंतर दर महिन्याला या लसीचे 100 दशलक्ष डोस तयार केले जाणार आहे. आपल्या लसीचे बहुतेक डोस मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये जातील, असं नोवोवॅक्सचे चीफ एक्झिक्युटिव्ह स्टॅनले इरेक यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना सांगितलं. तर, भारत या वर्षाच्या अखेरपर्यंत या लसीचे 20 कोटी डोस आणण्याच्या तयारीत आहे.

थोडक्यात बातम्या -

छत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले.

राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त 'या' शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल

'हिला कोणीतरी आवरा', योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल

उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील? सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या.

उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या भेटीत नेमकं काय झालं?, वाचा सविस्तर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top