Tuesday, 06 Aug, 9.36 am थोडक्यात

महाराष्ट्र
.आणि मुख्यमंत्रीपदही भाजपकडेच असेल- चंद्रकांत पाटील

मुंबई | शिवसेनेबरोबर जागा वाटप हा कळीचा मुद्दा असला तरी सध्याच्या संख्याबळाच्या आधारे भाजपलाच जास्त जागा मिळतील आणि मुख्यमंत्रीपदही भाजपकडेच असेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जागावाटपाचे सुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडलं आहे. त्यानुसार भाजपलाच जास्त जागा मिळतील आणि नैसर्गिक न्यायाने मुख्यमंत्रिपदावरही भाजपचाच दावा असेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

भाजप आणि शिवसेना युती कायम राहणार आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढलो तर त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होऊ शकतो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जागावाटपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तोडगा काढतील, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-येत्या काळात फक्त पवार कुटुंबंच राष्ट्रवादीत राहिल; मुख्यमंत्र्यांची बोचरी टीका

-'कलम 370 देशाशी केलेला विश्वासघात होता; अखेर हा कलंक मिटला'

-नितेश राणेंनी केलं मोदींच सरकारच्या निर्णयाचं कौतुक

-राखी सावंतने वयाच्या 40व्या वर्षी केलं लग्न!

-'पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही तर कमाल केलीत'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top