Saturday, 14 Dec, 7.36 am थोडक्यात

महाराष्ट्र
आपण मंत्री होऊन भगवानबाबांच्या दर्शनाला या; नारायण शास्त्रींचं धनंजय मुंडेंना निमंत्रण!

बीड | आपण मंत्री झाल्यावर गडावर येऊन वैकुंठवासी संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला या, असं निमंत्रण भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना दिलं. धनंजय मुंडेंनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

'साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा', असं म्हणत महंत नामदेव शास्त्रींनी आपल्याला गडावर दर्शनाला येण्याची 'आज्ञा' केल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

भगवानगडावर काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राजकीय हेव्यादेव्यांमुळं येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, स्वतः महंत नामदेव शास्त्री यांनीच मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निमंत्रण दिलं. त्यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

मराठवाड्याचे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या भगवान गडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्यानं पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे.

महत्त्वाच्या बाातम्या-

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top