Friday, 24 Sep, 12.28 pm थोडक्यात

महाराष्ट्र
आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर भरघोस चुका

मुंबई | येत्या 26 सप्टेंबर रोजी आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील 6200 पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर अनेक चूका छापून आल्यानं मोठा गोंधळ उडाला आहे.

काही परीक्षार्थींचं हॉल तिकीट डाऊनलोड होत नाही, तर काहींच्या हॉल तिकीटमध्ये चुका आहेत. वाशीममधील एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवर तर उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील परीक्षा केंद्राचा पत्ता छापून आला आहे. यामुळे या विद्यार्थ्याने मी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पेपर देवू का?, असा सवाल केला आहे.

काही हॉल तिकीटवर विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या जागी चुकीचं नाव छापून आलं आहे. काहींवर नेमकं परीक्षा केंद्र कोणतं हे समजत नाही. तर काहींच्या हॉल तिकीटवर चक्क लिंगच बदलून आलं आहे. या गोंधळाला जबाबदार कोण?, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, या गोंधळानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 8 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आरोग्य विभागाने 'न्यासा' या खासगी एजन्सीला भरतीचे कंत्राट दिल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या -

रोहितसाठी नरेन ठरतोय 'गुलीगत धोका'! तब्बल इतक्या वेळा हिटमॅन अडकलाय नरेनच्या जाळ्यात

अनिल देशमुखांवर मोठ्या कारवाईची शक्यता, ईडीनं उचललं हे पाऊल!

शेठ तुम्ही नादच केलाय थेट! दिनेश कार्तिकने धोनीला मागे टाकत केलाय हा भीम पराक्रम

स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं, तुमचं लक्ष कुठे असतं?- अमृता फडणवीस

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top