Thursday, 27 Jun, 1.04 am थोडक्यात

महाराष्ट्र
आता माघार नाही, विधानसभा लढवणारच; आशा बुचके आक्रमक

पुणे | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. हकालपट्टी झाली तर काय झालं. आता रणांगणातून माघार नाही.. विधानसभा लढवणारच, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप ठेवत शिवसेनेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र निलंबन झाले तरी मी विधानसभा लढवणारच, असं बुचके यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्षाचे मी प्रामाणिपणे काम केलं. मात्र तरीदेखील कारवाई झाल्याने मला मानसिक धक्का बसला आहे. असं असलं तरी मला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा असल्याने मी निवडणुकीसाठी सज्ज आहे, असंही बुचके म्हणाल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे स्वगृही (शिवसेनेत) परत आल्याने आशा बुचके यांची उमेदवारी धोक्यात आहे, असं मानलं जातंय.

महत्वाच्या बातम्या

-चंद्रकांतदादा बिनकामाची पाटीलकी सोडून द्या; राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांना टोला

-"मी पुतीन यांच्याशी काय बोलेल, हे तुमचं काम नाही"

-जिमला निघालेल्या काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

-केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई सुरु; एकाला औरंगाबादमधून अटक

-हम दिल दे चुके सनम. मलायकानंही अखेर मान्य केलं!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top