Thursday, 08 Apr, 10.28 pm थोडक्यात

होम
अखेर कोब्रा कमांडोला नक्षलवाद्यांनी सोडलं, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | बिजापूर नक्षलवादी हल्ल्यानंतर बेपत्ता झालेले सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंह परत आले आहेत. सीआरपीएफने या माहितीला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे, की नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंहला सोडले आहे. सीआरपीएफच्या म्हणण्यानुसार, परत आल्यानंतर राकेश्वर सिंह यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की, सीआरपीएफच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये राकेश्वर यांच्यावर उपचार केले जात आहेत.

यापूर्वी सीआरपीएफच्या सूत्रांच्या हवाल्याने बातमी समोर आली होती की नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह सोडले आहे. सूत्रांनी सांगितले होते की राकेश्वर सिंह मिन्हास यांच्यासमवेत काही न्यूज चॅनेल्सचे प्रतिनिधी आणि काही स्थानिक लोकांनाही सोडण्यात आले आहे.

राकेश्वर सिंह यांना सुखरुप परत आणण्यात धरमपाल सैनी यांची मुख्य भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. जवान परत आणण्यासाठी तयार केलेल्या दोन सदस्यांच्या दलात त्याचा समावेश होता. मीडिया रिपोर्ट्सनूसार, गुरुवारी राकेश्वर सिंह यांना गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैया यांच्यासह शेकडो लोकांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांनी मुक्त केले. त्यांच्याबरोबर आणखी 7 लोकांना देखील सोडण्यात आलं आहे. यामध्ये 4 पत्रकारांचा समावेश आहे. हे सर्वजण राकेश्वरसिंहबरोबर परतले आहेत.

राकेश्वर सिंह परत आल्याची बातमी समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा आनंद झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, राकेश्वर सिंह यांची पत्नी मीना देवी यांनी सांगितले की, त्यांना पतीच्या सुरक्षित परतण्याविषयी अधिकृत माहिती मिळाली आहे. मीना म्हणाल्या, की राकेश्वर सिंग यांची तब्येत बरी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं आहे.

नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांना कैद केल्यानंतर मीना देवी, त्यांची मुलगी आणि संपूर्ण कुटुंब हादरुन गेलं होतं. मीना देवी यांनी सरकारला आवाहन केलं होतं, की आपल्या पतीला सुखरुप परत आणावं. त्यांच्या मुलीने एका व्हिडिओमध्ये असेही म्हटले होते, की तिचे वडील लवकरच परत येतील. अखेर गुरुवारी प्रत्येकाची प्रार्थना फळाला आली आणि राकेश्वर सिंह परत आले.

दरम्यान, राकेश्वर सिंह परत आल्यावर बस्तर रेंजचे महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी देखील या कामात पोलिस आणि प्रशासनाला मदत करणार्‍या संस्था-संघटना, वरिष्ठ अधिकारी, माध्यम प्रतिनिधी तसेच स्थानिक लोकांचे आभार मानले आहेत.

3 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या एका मोठ्या तुकडीवर हल्ला केला होता. या भीषण चकमकीत सुरक्षा दलातील 22 जवान शहीद झाले होते तर डझनभर जवान जखमी झाले. परंतु, सीआरपीएफ आणि सैन्याने उत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात अनेक नक्षलवादी ठार झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

राकेश्वर सिंह यांना सोडतानाचा व्हिडीओ-

पाहा दुसरा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

कोरोना लस घेणाऱ्यांसाठी खुशखबर; उबर कंपनी देणार फ्रि राईड

रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात आरोग्यमंत्र्यांचे उत्पादक कंपन्यांना 'हे' महत्वाचे आदेश

कोरोनाची लस घेण्याआधी 'या' 5 गोष्टी आवर्जून टाळा; डॉक्टरांच्या महत्त्वाच्या सूचना

चिंता वाढली. पुण्यात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

पुण्यातील कोरोना बेड्स आणि व्हेंटिलेटरची आकडेवारी जाणुन घ्या एका क्लिकवर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top