Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अखेर रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड!

अखेर रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड!

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची वर्णी लागली आहे.

त्यांच्या निवडीसंदर्भात राज्य सरकारने अधिकृत घोषणा केली आहे. आज सरकारकडून या विषयीची अधिसूचना काढण्यात आली आहे.

रूपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा मागील काही दिवसांपासून राज्यभरात सुरू होती. पण त्यांची अखेर आज निवड करण्यात आली आहे. तसेच रूपाली चाकणकर या पदाचा कारभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या याआधी विजया रहाटकर अध्यक्ष होत्या. त्यांच्यानंतर हे पद रिकामं होतं. राज्यात महिलांचे वाढते अत्याचाराचे प्रकारावरून सातत्यानं राज्य सरकारवर टीका होत होती. या पदासाठी विद्या चव्हाण आणि चंद्रा अय्यगांर यांचं नावही चर्चेत होतं. पण आता रूपाली चाकणकर यांची वर्णी लागली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी रूपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरू असताना चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकर यांचं नाव न घेता त्यांना शूर्पनखेची उपमा दिली होती. चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर सर्वत्र चर्चा होताना दिसत होती.

थोडक्यात बातम्या -

MPSC उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यसेवा परीक्षेसाठी 'या' तारखेपर्यंत भरता येणार फाॅर्म

परमबीर सिंह बेपत्ता! उच्च न्यायालयात राज्य सरकारची धक्कादायक माहिती

'इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन' पाडून आता 'नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन' बांधणार

सर्वसामान्यांचं स्वप्न महागलं! कोळसा टंचाईमुळे वाढले बांधकाम साहित्याचे दर

'राणेंच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, वेळ आली की कुंडली बाहेर काढू'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat