Sunday, 01 Mar, 7.20 am थोडक्यात

महाराष्ट्र
अमोल कोल्हेंनी 'तो' प्रण फेटा बांधून पूर्ण केला

बीड | जेव्हा परळीकर धनंजय मुंडे यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन, असा प्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला होता. शनिवारी परळी येथे धनंजय मुंडे यांच्या हस्ते फेटा बांधून त्यांनी हा प्रण पूर्ण केला आहे.

परळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या भावा-बहिणीमध्ये चुरशीची लढत झाली. यात, पंकजा मुंडे यांना पराभव झाला. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या आव्हानाला परळीकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

अमोल कोल्हे यांना फेटा शोभून दिसतो. मित्र कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे. मला निवडून देणाऱ्या तमाम परळीकरांचे आभार, अशी प्रतिक्रिया यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.

अमोल कोल्हे यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांच्या रुपाने तुम्ही एक कर्तबगार मंत्री निवडून दिला आहात. त्याबद्दल सर्वांचे आभार, असं कोल्हे म्हणाले आहेत.

'शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची सवय लागलीय; पण.'

सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे जखम टोंगळ्याला अन् पट्टी मस्तकाला; बच्चू कडूंचा घरचा आहेर

देव देवेंद्र सुबुद्धी देवो आणि अमृताला प्रसिद्धी देवो; किशोर तिवारींची बोचरी टीका

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भगवा घेतलेल्या सचिन अहिरांवर सेनेने सोपवली 'ही' मोठी जबाबदारी!

'छ. संभाजी महाराजांना स्त्रियांचा आणि दारुचा व्यसनी म्हणणाऱ्या गोळवलकरांचा चंद्रकांत पाटील निषेध करणार का?'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top