Sunday, 21 Jul, 5.12 am थोडक्यात

होम
.अन् भावाचं कापलेलं शीर घेऊन तो थेट पोहचला पोलीस ठाण्यात!

हैदराबाद | तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात दोन सख्ख्या भावांनी चुलत भावाची गळा कापून हत्या केल्याची घटना घडली आहे. मोहम्मद गौस आणि इरफान गौस अशी या आरोपींची नावं आहेत.

हत्या केल्यानंतर मृत शेख सद्दामचं शरीर त्यांनी धडापासून वेगळं केलं. आणि ते कापलेलं शीर घेवून ते स्वत: पोलिस ठाण्यात पोहचले आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांचा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद आणि इरफान यांची बहीण रजिया आणि मृत सद्दाम शेख यांचे अनैतिक संबंध होते. शेख सद्दामपासून रजियाला दोन मुलं झाली होती. या मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिल्यामुळे हत्या केल्याचं आरोपींनी सांगितलं आहे.

दरम्यान, हे धक्कादायक चित्र पाहुन सुरवातीला पोलिसही हैराण झाले. त्यानंतर त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-अखेर कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

-हिमाची 'सुवर्ण धाव'; एकाच महिन्यात पटकवली 5 सुवर्ण पदकं

-जे.पी. नड्डा यांचा पहिलाच मुंबई दौरा, पण टाळली उद्धव ठाकरेंची भेट

-लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरवणं थांबवा; 'दादां'चा 'दादां'ना सल्ला

-बंदूूक घेऊन नाचणाऱ्या भाजप आमदाराला बिग बॉसचं निमंत्रण!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top