Thursday, 27 Feb, 6.28 pm थोडक्यात

महाराष्ट्र
'अंनिस'नं उचललं मोठं पाऊल; इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या

अहमदनगर | ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहे. अंधश्रद्धा निमूर्लन समितीनं इंदोरीकरांविरोधात असणारे पुरावे जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केले आहेत.

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली गेली होती.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना जवळपास क्लीनचीट दिली होती. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचा व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला होता. पोलिसांच्या सायबर सेललाही इंटरनेटवर असा कुठलाही व्हिडीओ आढळला नव्हता.

दरम्यान, पुराव्याअभावी इंदोरीकर महाराजांना क्लीनचीट मिळण्याची शक्यता होती, मात्र अंनिसनं या प्रकरणात लक्ष घातलं असून या प्रकरणाचे व्हिडीओ शोधून काढले आहेत. आता हेच व्हिडीओ जिल्हा शल्य चिकीत्सकांना देण्यात आले असून १५ दिवसांत इंदोरीकरांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ट्रेडिंग बातम्या-

बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसे देणार बक्षिस!

'अटकेपासून वाचण्यासाठी बाळासाहेबांनी आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवल्ली केली होती'

'नशीब ते जिवंत तरी आहेत'; न्यायमूर्तीच्या बदलीवरून रिचा चड्डाचा केंद्र सरकारला टोला

मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही- उद्धव ठाकरे

आपला पॅटर्नच वेगळा; सलमान खान करणार 'मुळशी पॅटर्न'चा रिमेक!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top