Saturday, 27 Feb, 3.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
अरुण राठोडने कबुली जबाब दिलेला 'तो' नंबर कुणाचा?- चित्रा वाघ

नाशिक | भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून पुणे पोलिसांसह ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली, त्या दिवशी अरुण राठोडने पुणे कंट्रोल रुमला कबुली जवाब दिला होता. त्यानंतर कंट्रोल रुमवरील एका महिलेने अरुण राठोडला दुसरा नंबर देऊन त्या नंबरवर कबुली जवाब द्यायला सांगितला. मात्र हा नंबर कुणाचा होता? त्या नंबरवर अरुण राठोडने कुणाकडे कबुली जवाब दिला?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

अरुण राठोडने सकाळी 8 वाजून 40 मिनिटाने कंट्रोल रुमवरील महिलेने दिलेल्या नंबरवर संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर अरुण राठोडला दोन मिनिटं थांबायला सांगितलं, आणि कॉन्फरन्स कॉलवर अजून एका व्यक्तीला घेऊन पुन्हा एकदा कबुली द्यायला सांगितली. त्यानंतर राठोडने तुम्ही कोण? असं विचारलं तर असं नाव सांगता येणार नाही, असं त्याला सांगितलं गेल्याचं चित्रा वाघ म्हणाल्यात.

अरूण राठोडच्या कबुलीची दखल का घेतला गेली नाही? तो नंबर कुणाचा होता? कॉन्फरन्स कॉलवर असलेला व्यक्ती कोण होता? हा नंबर पोलीस आयुक्तांचा आहे की पोलीस महासंचालकांचा आहे? पुणे कंट्रोल रुमच्या कोणत्या अधिकाऱ्याने हा नंबर दिला? कोणत्या अधिकाऱ्याचा नंबर दिला? याची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, पूजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांच्या नावाने 45 मिस कॉल्स आले होते. हा राठोड कोण? पोलिसांनी ते मिस्ड कॉल पाहिले की नाही? मिस्ड कॉल असणाऱ्या व्यक्तीचा शोध अजूनपर्यंत का घेतला गेला नाही? असे प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थीत केले आहेत.

थोडक्यात बातम्या -

'मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?'

'खुर्ची इतकी वाईट आहे का, की ज्या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही'

'बेजबाबदार वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का?'

'उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर संजय राठोडला फाडून खाल्लं असतं'

'चित्रा वाघच तुम्हाला पुरुन उरणार आहे'; चित्रा वाघ आक्रमक

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top