Dailyhunt
बनावटी प्रचार करणाऱ्यांविरोधात हा आपला विजय आहे- उर्मिला मातोंडकर

बनावटी प्रचार करणाऱ्यांविरोधात हा आपला विजय आहे- उर्मिला मातोंडकर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि सतत बेताल वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. उर्मिलाने तिच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेल्या समर्थकांचे आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट करत आभार मानले आहेत.

कंगना राणावतने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. त्यावेळी अनेकजण उर्मिलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. या सगळ्या सर्मथकांना 'अस्सल हिंदूस्थानी' असं संबोधून उर्मिलाने आज त्यांचे आभार मानले आहेत.

मला साथ देणाऱ्या निष्पक्ष तसेच प्रतिष्ठत मिडीयातील व्यक्तींचे मी मनापासून धन्यवाद देते.

फेक आयटी ट्रोलर आणि त्यांच्या प्रचाराविरोधात हा तुमचा विजय आहे. मी तुमच्या पाठिंब्याने मी खूप भारावून गेलेय…जय हिंद, असं ट्विट उर्मिलाने केलं आहे.

दरम्यान, उर्मिलाच्या या ट्विटवर अनेकांनी भरभरुन कमेंट केली आहे. अनेकांनी सिनेमासृष्टीला तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिचे आभार मानले तर अनेकांनी आम्हाला तुझा अभिमान वाटतो, असं म्हणतं प्रतिक्रीया दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat