Thursday, 27 Feb, 11.12 am थोडक्यात

महाराष्ट्र
बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसे देणार बक्षिस!

औरंगाबाद। बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना मनसे रोख पाच हजाराचं बक्षिस देणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मोर्चानंतर मनसेने मुंबईमध्ये बांगलादेशी ,पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आक्रमक भूमिका घेत विविध भागात जाऊन शोध मोहीम घेतली होती.

मनसे आता औरंगाबादमध्ये बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची पुराव्यानिशी माहिती देणाऱ्या नागरिकांना रोख पाच हजारचं बक्षिस देण्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे.

नागरिकांनी दिलेली माहिती मनसे कार्यकर्ते पोलिसांना देणार आहेत. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी मनसे शहरातील विविध भागात मंडप उभारणार असून नागरिकांना जर घुसखोरांची माहिती असेल तर कळवण्याचं आवाहन मनसेनं केलं आहे.

दरम्यान, पुण्यातील मोहिमेत आपल्याच देशातील नागरिकांना बांगलादेशी म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यामुळे कथित बांगलादेशी भारतीयच असल्याचे सिद्ध झाल्याने मनसेच्या या मोहिमेचा फज्जा उडाला होता.

ट्रेंडिंग बातम्या

'भाजप नेत्यांवर अजून FIR का दाखल झाला नाही?' असं सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची बदली!

.नाहीतर पेकाटात नक्कीच लाथ बसेल; 'सामना'तून भाजपवर टीकास्त्र

ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती- जितेंद्र आव्हाड

फक्त दहा रुपये भरा, पीएमपीचा प्रवास दिवसभर करा!

स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाच्या 'संघ' परिवाराचे योगदान काय?- शिवसेना

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top