Dailyhunt
भगवान श्रीरामाचरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साष्टांग दंडवत

भगवान श्रीरामाचरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साष्टांग दंडवत

अयोध्या | राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा थोड्याच वेळात संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले.

पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित आहेत.

पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला. दंडवत घालून मोदींनी रामलल्लाचं दर्शन घेतलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळ्याला सुरूवात झाली आहे. मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरूवात करण्यात आली आहे.

भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, राम मंदिरावर पाकिस्तान सरकारची टीका

राम मंदिराच्या पायाभरणीसाठी खास चांदीचं फावडं; उत्सुकता शिगेला

सर्व निमंत्रितांना राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून मिळणार 'ही' खास भेट

अयोध्या तो झांकी है उसके बाद भी बहुत कुछ बाकी है- बबिता फोगाट

मर्यादा पुरूषोत्तम रामाची तुमच्या मनातील व्याख्या, वाचा राम शब्दाचा व्यापक अर्थ.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat