Friday, 20 Sep, 5.20 am थोडक्यात

महाराष्ट्र
भाजप-सेनेच्या युतीबाबतच्या फॉर्म्युल्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात.

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचं सांगितलं आहे. भाजपची निवडणूक समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी 100 टक्के युती होईल, असं म्हटलं आहे.

युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजप आणि शिवेसना युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. 22 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपध्यक्ष अमित शाह मुंबईत असून यावेळी युतीची घोषणा केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शिवसेना भवनवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. शिवेसनेचे सचिव अनिल देसाई यांनी 100 टक्के युती होईल असा विश्वास व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top