Sunday, 15 Sep, 11.52 am थोडक्यात

होम
"भाजपने निदान 'छत्रपती' या उपाधीचा तरी मान ठेवायचा होता"

मुंबई | राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. एका नेत्याच्या घरामागील लॉनमध्ये उदयनराजेंचा पक्षप्रवेश करत 'छत्रपती' या उपाधीचा अवमान केल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

'छत्रपती' या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधीमागे असणारी व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्त्वाची वाटते, अशा भावना रोहित पवार यांनी फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन व्यक्त केल्या आहेत.

पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्याच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भाजपला मला एकच सांगायचं आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे, असं रोहित पवार यांनी लिहिलं आहे.

कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो तसाच आपणही तो मान ठेवावा, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top