Friday, 03 Jul, 4.04 pm थोडक्यात

होम
भारताला मोठं यश, कोरोनावरील 'ही' लस 15 ऑगस्टपर्यंत लाँच होण्याची शक्यता!

दिल्ली | कोरोना व्हायरसवर भारतात तयार केली जाणारी कोवाक्सिन ही लस 15 ऑगस्टपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. ही लस तयार करत असलेल्या भारत बायोटेक कंपनीला 15 ऑगस्टपर्यंत या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर (ICMR) ने दिलेत.

आयसीएमआरच्या सांगण्यानुसार, या कंपनीला 7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करावं असं सांगितलंय. यासाठी उशीर केला जाऊ नये. या ट्रायलचे निष्कर्ष लवकर आल्यास 15 ऑगस्टपर्यंत लस लॉन्च केली जाऊ शकते.

या लसीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) ने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. 'कोवॅक्सिन' नावाची लस भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेसोबत (एनआयव्ही) एकत्र येऊन तयार केली आहे.

हैदराबादची फार्मास्यूटिकल कंपनी भारत बायोटेकने ही लस तयार केली आहे. ICMR चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये 7 जुलैपासून या लसीची मानवी चाचणी सुरु होईल असं नमूद केलंय. यामुळं 15 ऑगस्टपर्यंत सामान्यांसाठी ही सल लॉन्च केलं जावं, असंही म्हटलं आहे.

जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, थेट सीमेवर जाऊन मोदींचं संबोधन

लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं, मोदींचा जवानांशी संवाद

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता..

सारथी संस्थेसाठी मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे- छत्रपती संभाजीराजे

येत्या 48 तासांत 'या' ठिकाणी मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला इशारा

पंतप्रधान मोदी यांचा थेट सीमेवरून चीनला इशारा, 'विस्तारवादाचं युग संपलं आता..'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top