Wednesday, 05 Aug, 10.52 am थोडक्यात

होम
भारताने आज रामराज्यात प्रवेश केला आहे- बाबा रामदेव

अयोध्या | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी अयोध्येत राम मंदिराचा पायाभरणी समारंभ पार पडत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आज अखेर उजाडला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव अयोध्येत दाखल झाले आहेत.

बाबा रामदेव अयोध्येत दाखल होताच त्यांनी हनुमानगढी येथे पूजा केली आहे. यावेळेस बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, 5 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस असून आपल्या कित्येक पिढ्या आजचा दिवस लक्षात ठेवतील. आज आपण रामराज्यात प्रवेश करत आहोत, असा आशावादही त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

दरम्यान आजच्या भूमिपूजनाच्या समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून विशेष विमानाने अयोध्येला रवाना झाले आहेत. 11.30 च्या सुमारास अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर त्यांचं आगमन होणार आहे. त्यानंतर पावणे बाराच्या सुमारास हनुमानगढी येथे जाऊन ते दर्शन आणि पूजा करणार आहेत.

दुपारी 12 वाजता राम जन्मभूमी परिसरात पंतप्रधान मोदींचं आगमन होईल. सव्वा बारा वाजता त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण केलं जाईल. दुपारी साडे बारा वाजता ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत तो भूमीपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

सलग 25 वर्ष आमदारकी भुषवलेले शिवसेना नेते अनिल राठोड यांचं निधन

भीती, भूक, भ्रष्टाचार अन आतंकवाद मुक्त समाजासाठी प्रभु श्रीराम मदत करतील - नितीन गडकरी

'रामायण' मालिकेतील सीता माईला अत्यानंद, म्हणाली यंदा दिवाळी खूपच लवकर आली.!

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top