होम
भारताने इंग्लंडला पाणी पाजत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात मारली धडक

अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लड यांच्यात चालू असलेल्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा एक डाव आणि 25 धावांनी विजय झाला आहे. अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने पुन्हा एकदा कमाल दाखवली आहे. अक्षर आणि अश्विन या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला लोळवलं आहे. इंग्लंडचा दुसरा डाव या फिरकी जोडीने अवघ्या 135 धावांवर गुंडाळला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती.
इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये 135 सर्वबाद धावा केल्या. यामुळे इंडियाचा एक डाव आणि 25 धावांनी विजय झाला आहे. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप'च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे.
अक्षर पटेल आणि आर अश्विन या फिरकी जोडीने कमाल केली आहे. या दोघांनीच इंग्लंडला दुसऱ्या डावात सर्वबाद केलं. या फिरकी जोडीने प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने पहिल्या डावात 365 धावा केल्या. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक 101 धावा केल्या. तर यावेळेसही वॉशिंग्टन सुंदर दुर्देवी ठरला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 146 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. तेव्हा पंतने सुंदरसह शतकी भागीदारी केली. या दोघांनी 113 धावा केल्या. त्यानंतर पंतने कसोटीमधील तिसरे शतक पूर्ण केले. पंतने 118 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावा ठोकल्या.
थोडक्यात बातम्या -
'कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला.'; चंद्रकांत पाटलांची महाविकासआघाडीवर सडकून टीका
चांगली खेळी करुनही पदरी निराशा, 'सुंदर'चं शतक थोडक्यात हुकलं
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले 'हे' आदेश
स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; 'या' जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार