Tuesday, 11 Aug, 12.12 pm थोडक्यात

होम
"छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही; मनगुत्ती प्रकरणात महाराष्ट्रानं नाक खुपसू नये"

बेळगाव | मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारणदेखील तापल्याचं पहायला मिळालं. आता या प्रकरणी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी एक वक्तव्य केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. बेळगाव जिल्ह्यात स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तींमध्ये महाराष्ट्राचं कोणतंही योगदान नाही, असं सतीश जारकीहोळी यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकातील स्थानिक विषयांमध्ये महाराष्ट्राने नाक खुपसू नये आणि याचा नैतिक अधिकारही त्यांना नाही, असं सतीश जारकीहोळी यांनी म्हटलं आहे. ते बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. यमकनमर्डी क्षेत्रातील कडोलीमध्ये 50 लाख रुपये खर्चून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्याने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मी स्वत: त्यात 15 लाख रुपये दिले आहेत, असं सतीश जारकीहोळी यांनी म्हटलंय.

प्रख्यात गझलकार आणि कवी-गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, पुण्यातील धरणांमध्ये 62.21 टक्के पाणीसाठा

'मला न्यूझीलंडला जाऊन रहायचंय, तिथं देवी जागृत आहे'; मराठी दिग्दर्शकाच्या वक्तव्यानं खळबळ

भारतात लॉकडाऊनच्या काळात 'या' देशी डेटिंग अ‌ॅपने डाउनलोडिंगमध्ये ओलांडला 1 कोटींचा आकडा

लॉकडाऊनच्या काळात भारतात लोकांनी गुगलवर जास्त प्रमाणात केलं 'हे' सर्च.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top