Wednesday, 05 May, 7.04 am थोडक्यात

होम
चीनमुळे पुन्हा जगाच्या डोक्याला ताप, 'या' देशांवर पडू शकतं हरवलेलं रॉकेट!

नवी दिल्ली | अंतराळात पाठवले गेलेलं चीनचं रॉकेट अंतराळात प्रवेश केल्यानंतर अनियंत्रित झाल्यामुळे ते आता पुन्हा पृथ्वीवर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जवळपास 100 फूट लांब असलेलं आणि 21 टन वजन असलेलं हे रॉकेट असल्याचं बोललं जात आहे. या रॉकेटचं नाव लॉन्ग मार्च 5बी वाय2 असून सध्या हे पृथ्वीच्या लो-ऑर्बिटमध्ये चकरा मारत आहे.

भुतलापासून 170 किलोमीटर ते 372 किलोमीटर अंतरावर हे रॉकेट तरंगत आहे. त्याबरोबरच त्याची गती 25,490 किलोमीटर प्रति तास म्हणजेच जवळपास 7.2 किलोमीटर प्रति सेकंद एवढी आहे.

चीनच्या तियानहे या स्पेस स्टेशनवरून हे रॉकेट लॉन्च करण्यात आलं होतं याचं एक मॉडेल अंतराळातील कक्षेमध्ये सोडून नियंत्रणात त्याला पृथ्वीवर परत यायचं होतं. परंतु चीनच्या स्पेस एजन्सीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी यावरचं नियंत्रण पूर्णपणे गमावलं आहे.

चीनने लॉन्च केलेलं हे रॉकेट नियंत्रणात राहून त्याला समुद्रात पाडण्याचं एकंदर नियोजन होतं. परंतु, अचानक या रॉकेटशी संपर्क तुटून त्यावरचे नियंत्रण पूर्णपणे गमावल्यामुळे ते अनियंत्रित झालं आहे आणि आता ते पृथ्वीवर पडू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याबरोबरच, नेमकं राॅकेट पृथ्वीवर कुठे पडेल हे सांगणं अवघड असल्याचंही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. यापूर्वीही पश्चिम आफ्रिका आणि अटलांटिक महासागरामध्ये चीनचं एक रॉकेट पडलं होतं. आफ्रिकेच्या एका गावाला तर या रॉकेटने संपूर्णतः नष्ट करून टाकलं होतं. परंतु या गावात कुणी राहत नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.

थोडक्यात बातम्या -

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top