Wednesday, 05 Aug, 10.40 am थोडक्यात

मुंबई
दांडगा जनसंपर्क असलेले शिवाजीराव गेले, गडकरींकडून श्रद्धांजली

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे.

अनेक पक्षातील नेत्यांशी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सलोख्याचे संबंध होते. पाटील यांच्या जाण्याने नितीन गडकरींनी दु:ख व्यक्त केले आहेत. दांडगा जनसंपर्क असलेले शिवाजीराव गेले, अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली आहे.

गडकरींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय, 'माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे नेते श्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख असलेल्या शिवाजीरावांचा जनसंपर्क दांडगा होता. निलंगा या त्यांच्या मतदारसंघात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. इश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो.'

शिवाजीराव पाटील निलंगेकर हे 1985 ते 1986 दरम्यान मुख्यमंत्री होते. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कारभार सांभाळला होता. अत्यंत शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. तसंच अभ्यासू नेत्यांपैकी एक अशी त्यांची ख्याती होती. स्वातंत्र्यलढ्यात देखील शिवाजीराव पाटील सहभागी होते.

दरम्यान, आज निलंग्यात त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमावली पाळून त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी असदुद्दीन ओवैसींचं एका ओळीचं वादळी ट्विट.!

अ‌ॅमेझॉनचा बंपर धमाका. या दोन दिवशी मोबाईलवर मिळणार मोठे डिस्काउंट!

UPSC Result | मराठवाड्याच्या जयंत मंकलेने अंधत्वावर मात करत मिळवला देशात 143 वा क्रमांक

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top