Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"देशाला वाचवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागेल"

"देशाला वाचवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागेल"

नवी दिल्ली | कोणतीही व्यक्ती किंवा देश असो, आयुष्यात एक प्रसंग असा येतो की आरपारचा निर्णय घ्यावा लागतो. आज ती वेळ आली आहे. देश वाचवायचा असेल, तर आपल्याला कठोर संघर्ष करावाच लागेल, असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला घेरण्यासाठी आज भारत बचाव आंदोलनाचं आयोजन केलं आहे. हे आंदोलन नवी दिल्लीतील रामलीला मैदानात होत आहे. यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

सोनिया गांधी यांनी अर्थव्यवस्थेची परिस्थिती, बेरोजगारी, शेतकरी यासह विविध प्रश्नांवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपले तरुण अशा बेरोजगारीचा सामना करत आहेत, ज्याचा सामना गेल्या दशकात कधीच करावा लागला नव्हता, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

हातातला रोजगार जात आहे. तुम्ही तरुणांच्या भविष्यासाठी कठोर संघर्षासाठी तयार आहात का?, असा प्रश्नही सोनिया गांधी यांनी केला आहे.

नागरिकत्व कायद्याचा निर्णय हजार टक्के योग्य- नरेंद्र मोदी

नेहरुंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पायल रोहतगीला…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat