Saturday, 28 Mar, 6.04 pm थोडक्यात

होम
देशसेवेची हीच वेळ. दानशूर रतन टाटांनी केली 500 कोटींची मदत

मुंबई | दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा वाढलेला आकडा कानी पडत आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकं आता करोनाविरोधातल्या लढ्यासाठी एकत्र येत आहेत. उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाच्या लढ्यातून सावरण्यासाठी 500 कोटी रूपये दिले आहेत.

टाटा ग्रुपने कोरोनाच्या लढाईत मोठं योगदान दिलं आहे. टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा यांनी ट्विट करून आपण 500 कोटी रूपये देत असल्याचं सांगितलं आहे.

आता काळाची गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच वेळ असल्याचं टाटा यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय उपकरणं आणि वैद्यकीय क्षेत्रांतील महत्त्वाच्या खरेदी यांसाठी टाटा ग्रुपकडून ही मदत दिली गेली आहे.

दरम्यान, साई मंदिराने 50 कोटी रूपये, मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिराने 50 कोटी रूपये तर अंबाबाई मंदिराने देखील 2 कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. दुसरीकडे अनेक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आपापल्या परीने अनेक संस्था, व्यक्ती कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान देत आहेत.

'या' त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री

गरज पडल्यास संपूर्ण राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा- मनसे

नारीला सलाम.. प्रथम कोरोना तपासणीचं किट बनवलं अन् नंतर बाळाला जन्म दिला!

'आमच्यावर उपासमारीची वेळ आलीये, मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकडेही लक्ष द्या'

'केंद्र सरकारनं 'रामायण' सुरु केलं, तसं राज्य सरकारनं 'स्वराज्यरक्षक संभाजी' सुरु करावी'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top