Sunday, 09 May, 8.52 pm थोडक्यात

होम
देशातील 3 राज्यांमध्ये मागच्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

नवी दिल्ली | भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. रुग्णवाढीमुळे देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्याही गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्याचं चित्र दिसून आलं.

या सर्व गंभीर आणि चिंताजनक गोष्टींमध्ये एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. देशातील 3 राज्यांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये एकही रुग्ण कोरोनामुळे मृत झाला नसल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात सकारात्मक वातावरण बनलं आहे.

देशभरात सध्या सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे मृत पावणार्‍यांच्या संख्येत वाढ होत असतानाच गेल्या 24 तासात देशातील लक्षद्वीप, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

गेल्या 24 तासात देशात 4092 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी महाराष्ट्रात तब्बल 864 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात 56 हजार 578 नवे कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले. संपूर्ण देशभरात आतापर्यंत 16 कोटी 14 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 17 लाख 84 हजार 869 नागरिकांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या -

पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

'गडकरींकडे जबाबदारी देण्याचा सल्ला मानला असता तर कोरोना नियंत्रणात असता'

'कोरोनाच्या चितेत लोक जळत होते, तेव्हा पंतप्रधान प्रचारात मग्न होते'

'राऊत कोणाच्या सांगण्यावरून भाजपवर टीका करतात, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो'

'कोरोना काळात राजकारण करू नका, पक्ष विसरून मदत करा'; गडकरींनी टोचले भाजप कार्यकर्त्यांचे कान

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top