Friday, 11 Jun, 4.37 pm थोडक्यात

होम
धक्कादायक! कोरोनाकाळात ऑनलाईन फ्रॉडची वेगानं वाढ; देशाचं तब्बल 'इतक्या' कोटींचं नुकसान

नवी दिल्ली | देशावर कोरोना संकट असताना अर्थिक समस्यांसोबतच आता आणखी एक समस्या वेगानं गंभीर रुप धारण करताना दिसत आहेत. या समस्यांमध्ये प्रमुख आहे ऑनलाईन सायबर फ्रॉड. सध्या या फ्रॉडच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. कोरोना काळात देशात डिजिटल अॅपद्वारे आर्थिक देवाण-घेवाण वाढलेली आहे. अशातच फसवणुकीचे प्रकरणं देखील 28 टक्क्यांनी वाढले आहेत.

माहितीनुसार, सायबर फ्रॉडच्या घटनांमुळे मागच्या वर्षी देशाचं सुमारे 25 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. मागच्या आर्थिक वर्षात देशात सायबर फ्रॉडमुळे सर्वाधिक 6 ते 7 हजार कोटींचं नुकसान एकट्या दिल्लीचं झालं आहे. त्यानंतर मुंबईचे 5 ते 6 हजार कोटी, गुजरातचे 4 ते 5 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. नुकसानीच्या यादीत मुंबई आणि गुजरात अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असल्याचं ग्लोबल इन्फॉर्मेशन कंपनी ट्रान्सयुनियनच्या एका अहवालातून समोर आलं आहे.

इंटेलिजन्स आधारित उद्योगांमधील देवाणघेवाणीत सर्वाधिक सायबर फ्रॉड झाले आहेत. भारतात सर्वाधिक नुकसान लॉजिस्टिक सेक्टरला सहन करावं लागलं आहे. या सेक्टरमध्ये डिजिटल फ्रॉड सर्वाधिक 24 टक्क्यांनी वाढला आहे. इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस कंपनी एक्सपिरीयनच्या एका अहवालानुसार, भारतात कोरोना महामारीदरम्यान उद्योग विश्वानं 46 टक्के अधिक सायबर फ्रॉडच्या आव्हानाचा सामना केला आहे.

दरम्यान, सोशल मिडीयावर अनेक उत्पादनांवर मोठी सूट देण्याचं आमिष दाखवून ग्राहकांकडून बॅंकेचे डिटेल्स मिळवत फ्रॉड केला जातो. सायबर गुन्हेगार लॉजिस्टीकला सर्वाधिक लक्ष्य करीत असून ओरिजनल ऑर्डरचे रुपांतर खोट्या ऑर्डर्समध्ये करत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना प्रॉडक्ट मेथडची चोरी आणि गुणवत्तेत बदलाचा सामना करावा लागत आहे. फार्मास्युटिकल क्षेत्र देखील सातत्यानं होणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे त्रासलं आहे.

थोडक्यात बातम्या -

शेवटी आईच हो ती! सिंहाच्या जबड्यातून म्हशीने माघारी आणलं रेडकाला, पाहा थरारक व्हिडीओ

भुकेल्या हत्तीने चक्क हेलमेट खाल्लं, पाहा व्हिडीओ

एकवेळ सवलत मिळेल, पण वीजबिल माफ होणार नाही- नितीन राऊत

मालक शवासन करत असताना कुत्र्याला झाला गैरसमज, कुत्र्याने केलं अस काही की., पाहा व्हिडीओ

भारतीय शास्त्रज्ञाची कमाल! 20 दिवसांत तयार केला खिशात बसणारा व्हेंटिलेटर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top