महाराष्ट्र
धक्कादायक! शेतमजुरानं केला 2 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती अतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथील 2 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घरच्या शेतमजुरानं 2 वर्षीय मुलीला बाहेर फिरवण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर नेलं. त्यानंतर या नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचार करुन चिमुरडीला घरी सोडल्यावर कुटुंबीयांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. या घटनेमुळं विश्वासानं घरातील शेतमजुराकडे सोपवलेल्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या या घटनेमुळे पीडितेचं कुटुंब हादरुन गेलं आहे.
याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपीचा शोध सुरु झाला. काही वेळातच चिमुरडीवर निर्दयीपणे अत्याचार करण्याऱ्या नराधमाला रामनगर पोलिसांनी जिवती पोलिसांच्या सक्रियतेनं अटक केलं. आकाश पवार असं अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय आरोपीचं नाव आहे.
दरम्यान, आरोपी आकाश पवार याला याप्रकरणी कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या-
'पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा'
'ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणा म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं'
राजकारणासाठी कोरोना लस व्यतिरिक्त अनेक व्यासपीठ, तिथं या दोन हात करु- अमित शहा
TikTok सह इतर चायनिज अॅप्सवरील बंदी कायम राहणार!
आगे आगे देखो होता है क्या- प्रसाद लाड