Sunday, 20 Oct, 4.20 pm थोडक्यात

महाराष्ट्र
धनंजय मुंडे, या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल- सदाभाऊ खोत

मुंबई | धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेबाबत जे वक्तव्य केलंय ते लाजिरवाणं आहे. जनता त्यांचं हे वक्तव्य सहन करणार नाही. उद्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे. आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

धनंजय मुंडेंनी जे वक्तव्य केलं ती राष्ट्रवादीची विचारधारा आहे. राष्ट्रवादीची भुमिका काय आहे हे जनतेला कळलंय, त्यामुळे या निवडणुकीत जनता राष्ट्रवादीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

पैशाच्या जोरावर धनंजय मुंडे राजकारणात झुंडशाही आणि गुंडशाहीचा वापर करत आहेत. जनता माफ करणार नाही. जनता त्यांना मताच्या रूपात उत्तर देईल, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या वादावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. सदाभाऊ खोत यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वादावर शरद पवारांची पहिली…

धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top